आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या घरामध्ये चोरी करणारा जेरबंद; रोख रक्कम लंपास

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​कडा (ता. आष्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेच्या घरी चाकूचा धाक दाखवून घरातील दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यातील आरोपी थावर उर्फ अक्षय मैदान भोसले (रा. कासारी, ता. आष्टी) यास जेरबंद केले.

कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका जयश्री शेळके या येथील शासकीय निवासस्थानी राहतात. ३० एप्रिल २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शेजारील निवासस्थानांना बाहेरून कड्या लावून दरवाजाला धक्के मारून आतली कडी तोडून प्रवेश केला होता. नंतर चाकूचा धाक दाखवून घरातील अडीच तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह सात हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी थावर उर्फ अक्षय मैदान भोसले (रा.कासारी) याच्या मुसक्या आवळत आष्टी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक भगतसिंह दुल्लत, हवालदार मुन्ना वाघ, पोलिस नाईक सोमनाथ गायकवाड, पोलिस नाईक सतीश कातखडे, प्रसाद कदम यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...