आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:अंबाजोगाईत घरफोडी; 1.80 लाख लंपास

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील जिजाऊ चौक परिसरात समोर आली. शनिवारी या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

प्रदीप बाबासाहेब गायकवाड (रा. जिजाऊ चौक, अंबाजोगाई) यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. १६ ते १७ जूनच्या दरम्यान प्रदीप हे घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेली १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली. गावाहून आल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. या प्रकरणी प्रदीप गायकवाड यांनी शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देेत पंचनामा केला. शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...