आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस-ट्रॅव्हल्स अपघातात बसचालकाचा मृत्यू, परळी-गंगाखेड मार्गावरील घटना, 25 जखमी

बीड6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी-गंगाखेड मार्गावरील करम गावाजवळील जिनिंगसमोर एसटी बस व खासगी ट्रॅव्हल्सचा समोरासमोर अपघात झाला. यात २५ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी एसटी बसच्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हनुमंत व्हावळे असे मृत बसचालकाचे नाव आहे. हा अपघात २८ जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

अपघातानंतर जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. तर तीन गंभीर प्रवाशांना सुरुवातीला परळीत आणल्यानंतर अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. एसटी बस (एमएच २० बी एल ४०७४) परळीहून नागपूरकडे जात होती. याच वेळी नांदेड येथून पुण्याकडे गंगाखेड येथील खासगी ट्रॅव्हल (एमएच २२ ३६१९) निघाली होती. दोन्ही वाहनांची परळी-गंगाखेड मार्गावर समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

जखमीत चौघांचा समावेश
बस-ट्रॅव्हल्स अपघातात रमेश ज्ञानोबा साळुंखे (४५, ता. औसा, जि. लातूर) ट्रॅव्हल्सचा कर्मचारी बापू श्रीराम गित्ते (३०, रा. नंदागौळ, ता. परळी वैजनाथ), संघपाल वैजनाथ रोडे (४५, रा. कनेरवाडी), सूरजकुमार वसंतराव शेळके (रा. धारूर, जि. बीड) यांचा गंभीर जखमीत समावेश आहे. तर एसटी बसचालक हनुमंत व्हावळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...