आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बसचालक प्रकाश चौरे यांचा मुलगा झाला फौजदार; ‘एनटीडी’मधून राज्यात पहिला

बीड7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील खंडाळा येथील अमोल चौरे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. एनटीडी प्रवर्गातून त्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. कोणताही क्लास न लावता स्वयंअध्ययन करून त्याने हे यश मिळवले आहे.खंडाळा (ता. बीड) येथील बसचालक प्रकाश चौरे व आई सुमन प्रकाश चौरे हे सर्वसाधारण परिस्थितीतील दांपत्य. त्यांना अविनाश, अमोल व आकाश ही तीन मुले आहेत. त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर भर दिला. आपल्या मुलाने शिकून मोठा अधिकारी व्हावे, असे स्वप्न वडिलांचे हाेते. अविनाश घरात मोठा असल्याने शिक्षण संपताच त्याच्यावर घराची जबाबदारी आली आणि दोन्ही भावांना पुढील अभ्यास करण्यास सांगितले. अमोल हा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. अमोलचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण बीडच्या भगवान विद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पूर्ण केले. नंतर त्याचा बीड येथे आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर लागला आणि तेथे त्यांनी इंजनिअरिंग पूर्ण केली. अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यावर पुण्यामध्ये एका खासगी कंपनीमध्ये तीन-चार महिने नोकरी केली परंतु स्वप्न हे मोठे अधिकारी होण्याचे होते म्हणून अमोल शांत बसला नाही. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मार्ग धरला. सन २०१५ पासून सातत्याने परीक्षेचा अभ्यास केला. सन, उत्सव, लग्नसमारंभ, नातेवाईक ह्या सर्वांचा त्याग करत कुठेही क्लास, लायब्ररी न लावता रात्रंदिवस घरीच अभ्यास सुरू केला. कष्टाचे चीज झाले. अखेर अमोल याने २०२२ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र झाला. सर्वसामान्यांची मुले ही अधिकारी होऊ शकतात हे अमोलने दाखवून देत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला.

बातम्या आणखी आहेत...