आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्यूटी पूर्ण करून टोकाचे पाऊल:वेळेवर पगार नाही, घरात अन्नाचा कणही नाही! बीडमध्ये एसटी बस चालक तुकाराम सानप यांची गळफास घेऊन आत्महत्या

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाचा पगार वेळेत होत नसल्याने बीडमध्ये एका बस चालकाने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. तुकाराम सानप असे आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव असून, त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी महामंडळाचा पगार वेळेवर जमा होत नसल्याने, तसेच आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. तुकाराम सानप हे बीड आगारात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. तुकाराम यांनी सोमवारी दिवसभर नियोजनानुसार बसच्या फेऱ्या पुर्ण केल्या त्यानंतर त्यांनी बीड शहरातील अंकुश नगर इथल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे. तुकाराम यांनी वीज बिल न भरल्याने त्यांच्या घरातील वीज गेल्या 15 दिवसांपुर्वीच खंडीत करण्यात आली होती. तसेच स्वयंपाकासाठी लागणारा किराणा सामान देखील संपला होता. त्यात 7 तारखेला होणारा पगार वेळेवर न झाल्याने त्यांनी सोमवारी रात्री नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. काम करून सुद्धा वेळेवर पगार मिळत नसल्याने एसटी कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहे.

बातम्या आणखी आहेत...