आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बससेवा:धामणगाव येथील 40 विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार बससेवा सुरू करण्यात यावी

आष्टी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून कडा येथे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र, त्यांना शाळेच्या वेळेनुसार बस उपलब्ध नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे धामणगाव ते कडा या दरम्यान सकाळी ८ आणि दुपारी शाळेच्या वेळेनुसार दीड वाजता बस सोडावी, अशी मागणी धामणगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

धामणगाव येथून सुमारे ४० विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी कडा येथे जात आहेत. मात्र, बसची वेळ त्यांच्या सोयीची नसल्याने विद्यार्थ्यांची गरैसोय होत असल्याचे लोखंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...