आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्रामीण भागातील बस अद्यापही बंदच; बससेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे होताहेत हाल

पिंपळवंडी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेला एस टी च्या कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने एस.टी सेवा पूर्ववत सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.अनेक आगारामधून लांब पल्ल्याच्या एसटी सुरु झाल्या आहेत मात्र, अद्याप ग्रामीण भागातील काही मार्गांर बसेस सुरळीत झालेल्या नाहीत. ग्रामीण भगातील सेव सुरु करण्याची मागणी होत आहे.

पाटोदा तालुक्यातील अंमळनेर, पिंपळवंडी, डोंगरकिन्ही, कुसळंब या मार्गावरून पाटोदा, जामखेड, पाथर्डी आगारातील अनेक एसटी सेवा खेड्यापाड्यापर्यंत सेा देत होत्या. पाटोदा आगाराची पाटोदा- पिंपळनेर मुक्कामी तसेच जामखेड आगाराची जामखेड-शिरूर मुक्कामी व आष्टी आगारातील आष्टी-रायमोहा शटलसेवा आणि पाथर्डी आगारातून पाथर्डी ते जामखेड दुपारी ये-जा करणारी एसटी कोपरगाव डेपोची कोपरगाव-डोंगरकिन्ही मुक्कामी एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

दोन वर्षापूर्वी कोरोनाचा कहर व मागील पाच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत ऐतिहासिक संप यामुळे एस.टी महामंडळाचे नियोजनच कोलमडले होते.या सर्व प्रकारच्या समस्येमुळे सामान्य जनतेचे बेहाल झाले.आता कोरोनाच्या संकटाचे ढग निवळले असून एस.टी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने सर्व कर्मचारी कामावर हजर झाल्याने आता एस.टी ची चाके पूर्वीप्रमाणे ग्रामीण भागातील खेडी-पाडी वस्त्यापर्यंत फिरण्यास काहीच आडसर नाही. खेड्यापाड्यातील कोरोना व संपामुळे बंद राहिलेल्या एस.टी सेवा पाटोदा- आष्टी-पाथर्डी-जामखेड आगार प्रमुखांनी पूर्ववत सुरू करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...