आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:दिंद्रुडमध्ये देवदूत प्रतिष्ठान पत्रकारांतर्फे; पुरस्कार जाहीर झाल्याने शिल्पा शेटे यांचा सत्कार

दिंद्रूडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिल्पा ओमप्रकाश शेटे यांना जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा सोलापूर समाजरत्न भूषण हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांचा देवदूत प्रतिष्ठान व दिंद्रुड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बंडू खांडेकर होते. निवृत्त पोलीस अधीक्षक तथा उद्योजक शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारातून जनकल्याण बहुउद्देशीय फाउंडेशन, पुणे या संस्थेच्या वतीने दिला जाणारा‘सोलापूर समाजरत्न भूषण’हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार दिंद्रुडचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांच्या पत्नी शिल्पा शेटे यांना मिळाला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अप्पर पोलीस महासंचालक प्रभात रंजन आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना तो सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.

या पुरस्काराबद्दल दिंद्रुड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने शिल्पा शेटे यांचा देवदूत प्रतिष्ठान व दिंद्रुड पत्रकार संघाच्या वतीने साडीचोळी, शाल, श्रीफळ देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश काशीद, संतोष स्वामी, दादासाहेब वकरे, गणेश काटकर आदींची उपस्थिती होती.यावेळी शिल्पा शेटे यांनी सत्कार केल्याबद्दल पत्रकार संघ व प्रतिष्ठानचे आभार व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...