आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेज-अंबाजोगाई रस्त्यावरील होळजवळ गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास झालेल्या भरधाव इनोव्हा कार आणि ॲपेरिक्षाच्या भीषण अपघातात ॲपेरिक्षातील चार जण जागीच ठार झाले होते. तर गंभीर जखमी असलेल्या दोन महिलांसह चौघांचा रात्रीतून उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता या अपघातातील मृतांची संख्या ८ झाली आहे.
वडिलांचे निधन झाल्याने मच्छिंद्रसिंग चरणसिंग गोके हे कुटुंबासह केजला रक्षा सावडण्याच्या कार्यक्रमाला आले होते. तेव्हा केज-अंबाजोगाई रस्त्यावर होळ शिवारात ॲपेरिक्षाला (एमएच २३ एक्स ५२२९) इनोव्हा कारने (एमएच १६ सीएन ७००) जोराची धडक दिली. यात ॲपेरिक्षाचालक बालाजी संपत्ती मुंडे (२८), मच्छिंद्रसिंग चरणसिंग गोके (४८), प्रिया दीपकसिंग गोके (२), युवराजसिंग दीपकसिंग गोके (१) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले दीपकसिंग गोके, भारतीकौर गोके, हरजितसिंग टाक, चंदाबाई टाक या चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मृत बालकांच्या आईवडिलांनी सोडला प्राण : या अपघातात प्रिया दीपकसिंग गोके (२) व युवराजसिंग दीपकसिंग गोके या बालकांचे वडील दीपकसिंग गोके व आई भारतीकौर गोके हे दोघे गंभीर जखमी झाले होते. या दोघांचीही उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. गोके कुटुंबातील पाच जण मरण पावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.