आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुटखा जप्त:केजच्या पोलिसांनी गुटखा विक्रेत्यास पकडले; दुचाकी, मोबाइलसह 19 हजारांचा गुटखा जप्त

केज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज पोलिसांनी दुचाकीवर फिरून गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीस पकडले. त्याच्याकडून १९ हजार २७१ रुपयांचा गुटखा, मोबाइल व दुचाकी असा ६६ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना एक गुटखा विक्रेता गुटख्याचा माल घेऊन दुचाकीवरून साळेगाव मार्गे चिंचोली माळीकडे जात असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून जमादार बालाजी दराडे, पोलिस नाईक सचिन अहंकारे, महादेव बहिरवाल, शीतल धायगुडे, चौधरी यांच्या पथकाने रविवारी सकाळी चिंचोली माळी येथील नागबेट चौकात सापळा लावून रतन कांताराम पारवे (रा.उमरी रोड,केज) यास दुचाकीवरून (एम.एच. ४४ ई ३९२९) गुटखा घेऊन जाताना पकडले. गुटख्यासह १२ हजारांचा मोबाइल, ३५ हजारांची दुचाकी असा ६६ हजार २७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...