आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठी दारू:गावठी दारू अड्ड्यावर  केज पोलिसांचे छापे

केज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज पोलिसांनी भवानी चौक व क्रांती नगर भागातील गावठी दारू अड्डयावर छापे मारून ९ हजार ५९० रुपयांची १७५ लिटर गावठी दारू पकडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.

केज पोलीस ठाण्याचे प्रमुख सपोनि शंकर वाघमोडे, पोलिस नाईक महादेव बहिरवाल, बाळासाहेब अंहकारे, पोलिस शिपाई गोरख फड यांच्या पथकाने १८ नोव्हेंबर रोजी धारूर रस्त्यावरील भवानी चौक परिसरात बेकायदेशीररीत्या गावठी दारू विक्री करीत असलेल्या अड्डयावर छापा मारला. यावेळी दारू विक्री असलेली सुमन सौदागर काळे (रा.भवानी चौक) ही महिला पळून गेली. पोलिसांनी तिच्या घरासमोरील ३ हजार रुपयांची ६० लिटर गावठी दारू जप्त केली.

त्यानंतर याच भागात पोलिसांनी छापा मारला असता गावठी दारू तयार करीत असलेला गाैण्या शंकर पवार ( रा. भवानी चौक) हा पळून गेला. त्याठिकाणाहून पोलिसांनी ३ हजार ९०० रुपयांची ७० लिटर गावठी दारू जप्त केली. कानडी रस्त्यावरील क्रांती नगर भागात छापा मारला असता गावठी दारू तयार करीत असलेला अजय काळे (रा. क्रांती नगर) हा पळून गेला. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील २ हजार ६५० रुपयांची ४५ लिटर गावठी दारू जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...