आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:केज : रिपाइंचा एक तास रास्ता रोको

केज11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवता येथे इंटरनेटची सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखेचे स्थलांतर मागील काही वर्षांपूर्वी केज शहरात करण्यात आले होते. मात्र आता ही सुविधा उपलब्ध झालेली असताना मूळ ठिकाणी शाखा सुरू होत नसल्याने तालुका रिपाइंने गुरुवारी कानडी रस्त्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

येवता (ता. केज) या गावातून बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची शाखा ही गावात इंटरनेटची सुविधा मिळत नसल्यामुळे मागील काही वर्षांपूर्वी केज येथे तात्पुरती स्थलांतरीत करण्यात आली होती. परंतु आता सर्वत्र भौतिक सुविधा आणि जलदगतीने इंटरनेट सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी देखील ही बँक मूळ ठिकाणी येवता येथे बँक अद्यापही सुरू केली गेली नाही. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेचे येवता या मूळगावी स्थलांतर करण्यात यावे अन्यथा केज तालुका रिपाइंच्या वतीने २२ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष दिपक कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला होता.

बातम्या आणखी आहेत...