आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:केजच्या पाणी प्रश्नावर उपोषण; आश्वासन दिल्याने घेतले मागे

केज13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १ मध्ये येत असलेल्या क्रांतीनगर भागातील पाणीप्रश्न गंभीर असताना चार महिन्यांपासून पाठपुरावा करून त्याची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे या प्रभागातील नगरसेवकाने नगरपंचायतीसमोर गुरुवारी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दरम्यान, नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले.

राष्ट्रवादीचे नगरसेवक अझहरोद्दीन शेख यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची व नवीन बोअर घेण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी नगरपंचायतीकडे लावून धरत ४ महिन्यांपासून पाठपुरावा केला. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नगरपंचायतीकडून टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी ११ वाजता नगरसेवक शेख नपं.कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते. या वेळी नगराध्यक्ष सीता बनसोड व प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे यांनी त्यांची भेट घेत १५ दिवसांत मागण्या सोडवू, असे आश्वासन दिले. त्यांनी उपोषण मागे घेतले.

बातम्या आणखी आहेत...