आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:केएसकेत जात प्रमाणपत्र समितीकडून होणार शिबिर

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने बीड येथील केएसके महाविद्यालयात २३ डिसेंबर रोजी प्रमाणपत्रांसाठीच्या प्रस्ताव स्वीकारण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत विशेष शिबिरांचे आयोजन केले गेेले आहे. या शिबिरात ११ वी १२ वी विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फ़त प्रस्ताव स्विकारले जात आहेत.

२३ डिसेंबर रोजी बीड तालुक्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य, लिपिक, समान संधी केंद्राचे प्रतिनिधी यांनी कार्यालयीने वेळेत केएसके महाविद्यालय येथे समितीचे कर्मचारी, समतादुत उपस्थित राहणार असल्याने आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव सादर करावेत. या प्रस्तावाची छाननी करून समितीचे कर्मचारी आपल्याला परिपूर्ण असलेल्या प्रस्तावाची पोहोच पावती देणार आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रस्ताव तालुक्यातच स्वीकारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना यामुळे आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तर्फे विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...