आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू:अवैध दारू विक्रीविरोधात‎ मोहीम; पोलिसांचे छापे‎

केजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या निवडणूक‎ काळात हॉटेल, धाब्यावर‎ अवैधरीत्या दारूची विक्री वाढली‎ आहे. युसूफवडगाव पोलिसांनी‎ सातेफळ, लाडेवडगाव, होळ, पाथरा‎ या ठिकाणी हॉटेल, ढाब्यावर छापे‎ मारत देशी व विदेशी दारूच्या‎ बाटल्या जप्त केल्या. याप्रकरणी‎ चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.‎

युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे‎ सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप‎ दहिफळे यांच्या पथकाने छापे मारले.‎ यावेळी सातेफळ येथील सिद्धेश्वर‎ रावसाहेब भांगे यांच्या जगदंबा‎ ढाब्यावरून २ हजार ३२० रुपयांच्या‎ देशी दारूच्या ३१ बाटल्या व ६६०‎ रुपयांच्या विदेशी दारूच्या ३ बाटल्या‎ जप्त केल्या. लाडेवडगाव येथे देशी‎ दारूची विक्री करणाऱ्या कृष्णा‎ अशोक केंद्रे यास ताब्यात घेत देशी‎ दारूच्या ६० बाटल्या जप्त केल्या.

बातम्या आणखी आहेत...