आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन‎:दिंद्रुड हद्दीतील 11 ग्रामपंचायतींच्या प्रचारतोफा‎ थंडावल्या ; प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन‎

दिंद्रुड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड‎ पोलीस हद्दीतील अकरा ग्रामपंचायत‎ चे मतदान उद्या रविवारी (ता.१८)‎ संपन्न होणार आहेत. तब्बल आठ‎ दिवसाच्या प्रचारानंतर शुक्रवारी‎ सायंकाळी प्रचार यंत्रणा थंडावल्या.‎ मतदान प्रक्रियेत आचारसंहितेचा भंग‎ होऊ न देता, शांतता राखण्याचे‎ आवाहन दिंद्रुड पोलिसांनी केले‎ आहे.‎ माजलगाव तालुक्यातील‎ राजेवाडी, श्रीक्षेत्र बाभळगाव,‎ आनंदगाव, पिंपळगाव नाखले,‎ नाखलगाव या पाच ग्रामपंचायती तर‎ धारूर तालुक्यातील तेलगाव, श्रीक्षेत्र‎ देवदहिफळ, बोडखा, कारी,‎ चाटगाव व संगम या सहा‎ ग्रामपंचायतच्या मतदान प्रक्रिया‎ रविवारी संपन्न होणार आहे.

दरम्यान ‎गेल्या आठ दिवसांपासून‎ ठिक-ठिकाणी शांतता समितीच्या‎ बैठका दिंद्रुड पोलिसांच्या वतीने‎ घेण्यात आल्या असून, उद्या मतदान प्रक्रियेत गोंधळ घालणाऱ्या वर‎ कठोर कारवाई करणार असल्याचे‎ दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रभा ‎पुंडगे यांनी माध्यमांद्वारे सांगितले‎ आहे. दिंद्रुड पोलीस हद्दीतील अकरा ‎ग्रामपंचायत करिता सहा पोलिस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक,‎ तर सहा.पोलीस उपनिरीक्षकासह‎ पस्तीस पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख‎ बंदोबस्त ठेवला असून, मतदान‎ प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी‎ पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे‎ सहाय्यक पोलिस निरीक्षक पुंडगे‎ यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...