आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:अग्निपथ योजना रद्द करा; धारूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने, प्रशासनाला दिले निवेदन

धारूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने तरुणांसाठी सुरू केलेली अग्निपथ योजना रद्द करावी, यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सोमवारी धारूरमध्ये आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसही या योजने विरोधातील आंदोलनात उतरली आहे. प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके यांच्या सूचनेवरून सोमवारी धारूरमध्ये आंदोलन केले.

या वेळी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सरचिटणीस प्रा. ईश्वर मुंडे, शहराध्यक्ष नितीन शिनगारे, युवक तालुकाध्यक्ष विजय घोळवे, परमेश्वर राऊत, बालासाहेब मायकर, बंडू मस्के, सटवा अंडील, प्रदीप नेहरकर, पांडुरंग सोळंके, रणजीत रुपनर, चिंतामणी सोळंके, ज्ञानेश्वर शिंदे, बप्पा चव्हाण, सुरेश अंडील, विश्वास शिनगारे, लखन काशीद व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...