आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोरिक्षा:उमेदवाराची धांदल: प्रचार किटलीचा, चिन्ह ऑटोरिक्षा

धारूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रचार केला एका चिन्हाचा अन् मतदानासाठी निवडणुकीसाठी दुसरे चिन्ह आल्यामुळे उमेदवारासह प्रचारकांची धांदल उडाल्याचा प्रकार धारूर तालुक्यातील देवदहीफळ येथे घडला. नेमकी चूक कोणाची हे मात्र अद्याप समजले नसून उमेदवाराला ही बाब कळताच त्यांनी रात्रीतून प्रचाराचे पॉम्पलेट छापून मतदारांना वाटप केले.

धारूर तालुक्यातील देवदहीफळ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठी वाॅर्ड क्रमांक २ मधून सुधामती दामोदर बडे निवडणूक लढवत आहेत. त्यांना ७ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले होते. चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांनी आपल्या वाॅर्डमध्ये प्रचार केला होता. रविवारी मतदान असल्यामुळे सर्व मतदान प्रक्रिया पार पाडून घेणारे अधिकारी, कर्मचारी देवदहीफळमध्ये शनिवारी दाखल झाले होेते. उमेदवारास कोणते चिन्ह आहे हे अधिकारी गावात आल्यानंतर मतपत्रिकेवर ऑटो रिक्षा असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उमेदवाराची धांदल उडाली.

बातम्या आणखी आहेत...