आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत:ग्रामपंचायत निवडणुका लढलेल्या‎ उमेदवारांनी खर्च सादर करावा‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड तालुक्यातील १३२ ग्रामपंचायतीच्या‎ सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ रोजी‎ मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, २० डिसेंबर रोजी‎ मतमोजणी झालेली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल‎ करणारे सर्व उमेदवार यांनी निवडणूक निकाल‎ जाहिर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनी राज्य‎ निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व सूचनेनुसार‎ आपला निवडणुकीचा दैनंदिन खर्चाचा हिशोब ३०‎ दिवसाच्या आत दाखल करणे अनिवार्य आहे.‎

नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या सर्व उमेदवारांनी‎ निवडणूक खर्चाचा हिशोब तहसील कार्यालय‎ बीड येथील सभागृहात खर्च पथक करण राजपूत,‎ लेखाधिकारी तथा खर्च पथक प्रमुख यांच्याकडे‎ सादर करावा, असे अावाहन बीड तहसीलदार‎ सुहास हजारे यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...