आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याची दहशत:आणखी किती जणांचे बळी घेण्याची वाट पाहणार,आमदार सुरेश धस यांचा राज्याच्या वनमंत्र्यांना सवाल

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यातील तीन व करमाळा तालुक्यात दोन बळी घेतले

आष्टी तालुक्यातील बिबट्याची दहशत सध्या करमाळा तालुक्यात गेली आहे. राजकारण बाजूला ठेऊन राज्याच्या वनमंत्र्यांनी आता बाहेर पडून हा नरभक्षक बिबट्या जेरबंद करावा. नाहीतर त्याला ठार मारण्याची परवानगी द्यावी. आणखी किती लोकांचे बळी जाण्याची आपण वाट पाहणार असा सवाल भाजपचे आमदार सुरेश धस यांनी वनमंत्री संजय राठोड यांना केला आहे .

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीत सध्या राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे दंग आहेत आष्टी तालुक्यातुन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात गेलेल्या नरभक्षक असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने दखल घेण्याची गरज आहे. नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यातील तीन व करमाळा तालुक्यात दोन बळी घेतले आहेत. आणखी किती बळी घेण्याची वाट बघणार आहेत. आता तरी राज्याचे वन मंत्र्यांनी जागे होऊन वन अधिका-यांना तात्काळ सुचना देऊन बिबट्या कसा जेरबंद करता येईल ते पाहवे किंवा त्याला ठार मारण्याची परवानगी तरी तात्काळ द्यावी अशी मागणी भाजपचे विधानपरिषेदेचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser