आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:करिअर अकॅडमी ; खासगी शिकवणी वर्ग चालकाची आत्महत्या

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका खासगी शिकवणी वर्ग चालकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. राजाराम शिवाजी धस (४०, रा. नाथसृष्टी, अंकुशनगर, बीड) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. राजाराम धस हे गेल्या २० वर्षांपासून खासगी क्लासेस चालवत होते. मूळचे केज तालुक्यातील सारणी गावचे राजाराम धस वडील पोलिसांत असल्यामुळे बीड शहरात वास्तव्याला आले.

काही वर्षे शहरातील एका करिअर अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून काम केल्यानंतर गेल्या आठ वर्षापासून शहरातील अंकुशनगर भागात ते स्वतःच ब्राईट स्पर्धा परीक्षा केंद्र चालवत होते. ८ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास राजाराम धस यांनी कुटुंबीयांसोबत जेवण केले. त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत झोपी गेले.

दरम्यान, तीन वाजेच्या सुमारास त्यांचा लहान भाऊ झोपेतून उठला असता एका बंद असलेल्या खोलीचा दरवाजा त्याला उघडा दिसला आणि त्याने आत पाहिले असता राजाराम धस यांनी गळफास घेतलेल्याच त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी येऊन मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. राजाराम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडिल असा त्यांचा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...