आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा जणांना ताब्यात:परळीत शेतीच्या वादातून मृत्युप्रकरणी दहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा; सहा जण ताब्यात

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी परळी शहरातील इस्लामपुरा बंगला भागातील दोन कुटुंबात शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत इलियास इब्राहिम शेख यांचा मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणी दहा जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

परळी शहरातील इस्लामपुरा बंगला भागातील शेख कुटुंबाची धारावती तांडा शिवारात जमीन असून या जमिनीवरून गत अनेक वर्षांपासून वाद आहे. ४ ऑक्टोबर रोजी इलियास इब्राहिम शेख हे आपल्या कुटुंबासह सोयाबीन काढणी करत असताना दुपारी ३ वाजता मंजूर कासिम शेख, नदीम मंजूर शेख, युनूस कासिम शेख, अनिस कासिम शेख, जहूर कासिम शेख, समिउद्दीन शेख, आबेद शेख, मोबिन ऊर्फ कस्तूर मंजूर शेख, बुराखबी मंजूर शेख, शोकतबी शेख हे धारावती शिवारातील शेतात जाऊन तेथे सोयाबिनची काढणी करत असलेल्या इलियास इब्राहिम शेख,अरबाज इलियास शेख, हाजराबी इलियास शेख यांच्यावर काठ्या, कुऱ्हाडींनी हल्ला केला यात इलियास शेख यांचा मृत्यू झाला तर आरबाज व हाजिराबी हे दोघे गंभीर जखमी झाले.

याप्रकरणी शेख अब्दुल इलियास यांच्या फिर्यादीवरून दहा जणांविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि तथा तपासी अधिकारी मारुती मुंडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...