आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिवार्य:आरक्षित जागेवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आता बंधनकारक

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असल्यानेे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केलेली नाही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज तत्काळ सादर करावे.

शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या असल्याने चालू शैक्षणिक वर्षात जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नये यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला नाही त्यांनी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा व त्या अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति जोडून ज्या जिल्ह्यातील जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी. हमीपत्राचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे, अर्जदाराने अर्जात नमूद केलेला ई-मेल व संपर्क क्रमांक जतन करून ठेवावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांच्याकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...