आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 गोवंशांची सुटका:कत्तलखान्यात जाणाऱ्या गोवंशांची केली सुटका

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

तालुक्यातील नेकनूरहून हैदराबादच्या कत्तलखान्यात जाणाऱ्या १२ गोवंशांची सुटका करुन तीन जणांविरोधात युसूफ वडगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

नेकनूर येथून हैदराबादच्या कत्तलखान्यात १२ गोवंशीय जनावरे कत्तली साठी घेऊन जात असल्याची माहिती कुमावत यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार, पथकातील बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, राजू वंजारे यांनी केज-अंबाजोगाई रोडवर युसूफ वडगाव पोलिस ठाणे हद्दीत सापळा लावला. संशयित टेम्पो (एम एच २५, यू ०६६९) तिथे येताच त्यांनी झडती घेतली. या वेळी १२ गोवंशीय जनावरे आढळून आले. चालक जाफर शेख व क्लिनर अमोल पावले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही जनावरे नेकनूर येथील व्यापारी शौकत शेख यांची असल्याचे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...