आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुऱ्हाडीने हल्ला:पिकाचे नुकसानीचे कारण; पितापुत्रावर कुऱ्हाडीने हल्ला

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिकाचे नुकसान झाल्याच्या कारणावरुन पितापुत्रावर कुऱ्हाडीने हल्ला करुन जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना परळी तालुक्यातील सारडगावमध्ये घडली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंेद केला आहे.

श्रीमंत मारुती आंधळे (३५) यांनी या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, ते १८ नोव्हेंबर रोजी शेतातून घरी येत असताना गोविंद माणिक आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना घरासमोर अडवून ज्वारीच्या पिकाचे नुकसान केल्याचे कारण काढून कुऱ्हाडीने व काठीने बेदम मारहाण केली. श्रीमंत यांच्यासह त्यांचे वडिल मारुती आंधळे यांनाही जबर मारहाण केली गेली.

यात पितापुत्र जखमी झाले. या प्रकरणी गोविंद माणिक आंधळे, ऋषीकेश गोविंद आंधळे, दामोदर माणिक आंधळे, माणिक गंगाराम आंधळे, लक्ष्मी गोविंद आंधळे आणि इतर पाच जणांविरोधात परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...