आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टीकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर हे प्रकरण वेगवेगळे वळण घेत आहे. या प्रकरणासंबंधीत अनेक सत्य समोर येत आहेत. तसेच ही हत्या की, आत्महत्या असे अनेक प्रश्न सर्वांना पडले आहेत. दरम्यान आता पूजा चव्हाणच्या मृत्यूचे सत्य बाहेर येण्यासाठी सीबीआय चौकशी करुन निष्पक्षपातीपणाने चौकशी करा अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईं यांनी केली.
तृप्ती देसाई यांनी आज शनिवारी पूजा चव्हाणच्या कुटुंबियांची वसंतनगर येथे भेट घेत सांत्वन केले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पुजाच्या मृत्यूला दोन आठवडे उलटले आहेत. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असे काहीही लागलेले नाही. त्यामुळे विरोधकांकडून ठाकरे सरकारवर टीका होत आहे. आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगितले. राज्यातील एखादा मंत्री गायब कसा काय व्होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणातील सत्य बाहेर आले पाहिजे यासाठी सीबीआय चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या.
पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर काही ऑडियो क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या क्लिपमध्ये दोन व्यक्ती फोनवर बोलत असल्याचे संभाषण होते. फोनवर बोलत असेलली व्यक्ती ही उच्चपदावर असल्याचे बोलण्यावरुन वाटत होते. ही व्यक्ती महाविकास आघाडीतील एक मंत्री असल्याचा आरोप भाजप कडून केला जात आहे. तसेच याची सखोल चौकशी केली जाईल असेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.