आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळी:सिनेअभिनेते गोविंदा यांच्या उपस्थितीत केक कापून परळीत शरद पवारांचा वाढदिवस साजरा

परळीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपरवाला धनंजय मुंडे की नेकीं देख उनके साथ - अभिनेता गोविंदा
  • हिंदी चित्रपट सृष्टी उभी करण्यात महाराष्ट्राचेच सर्वात मोठे योगदान - गोविंदा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आगळा वेगळा अभीष्टचिंतन सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण होते परळीत सपत्नीक आलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंदा! अभिनेते गोविंदा व मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी ८१ किलो वजनाचा केक कापून सर्वांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करणे, ५००० महिलांना साडी वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम आयोजिण्यात आले होते.

'पूर्वी १९९९ साली गोविंदा परळीत आले तेव्हा म्हणाले होते की धनंजय मुंडे हा माणूस मोठा होईल!' प्रभू वैद्यनाथाचे व परळीतील जनतेचे आशीर्वाद घेऊन आज राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते काम करत आहेत, यावर गोविंदा यांनी 'परळी ही प्रभू वैद्यनाथ शिवजी यांची भूमी असून, येथे प्रामाणिक पणाने जनतेची सेवा करणारा माणूस नक्कीच ईश्वराच्या कृपेने मोठा होत असतो, असे गौरवोद्गार काढले. 'धनंजय मुंडेजीने जो सेवा सामान्य लोगो की की है, वह देख उपरवाला उनके साथ है, धनंजय मुंडे जैसे नेता असली जिंदगी के हिरो है' या शब्दात गोविंदा यांनी धनंजय मुंडे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना गोविंदा यांनी बॉलीवूड ही महाराष्ट्राची व मुंबईची देन असून याला उभं करण्यात पवारांसारख्या नेतृत्वाचा मोठा हातभार आहे. मुंबई अनेक उद्योग आणि विविधतेने नटलेले जागतिक दर्जाचे शहर असून याचा विकास करण्यात नेतृत्वाचा हातभार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र सार्वभौम असून महाराष्ट्राने देशाला कला, संस्कृती, इंडस्ट्री अशा अनेक गोष्टी दिल्या आहेत असे गौरवोद्गार काढले, तसेच महाराष्ट्राच्या विकासात शरद पवारांचे फार मोठे योगदान असल्याचेही म्हटले.

धनंजय मुंडे यांनी आपल्या अभिष्टचिंतानाच्या भाषणात शरद पवार यांनीच आपल्याला आयुष्यातली पहिली मोठी संधी दिली, आज त्यांनी संधी दिली म्हणून मी राज्यात मंत्री म्हणून काम करू शकत असल्याचे म्हटले.

शरद पवारांना शुभेच्छा देताना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांचे व्याक्तित्व हे एक चालते बोलते विद्यापीठ असून राज्याच्या विकासात आणि शेतकऱ्याच्या प्रगतीत साहेबांचे योगदान फार मोठे असल्याचे नमूद केले.

दरम्यान परळीच्या जनतेने आपल्याला भरभरुन प्रेम दिले असून, त्यांचे ऋण कधीही फेडणे शक्य नाही, पवार साहेबांच्या किमयेने आलेल्या या सरकारच्या माध्यमातून आपण परळीकरांना दिलेला एक एक शब्द पूर्ण करून दाखवू असेही मुंडे यांनी पुन्हा एकदा परळीतील जनतेसमोर बोलून दाखवले आहे.

पत्नी सुनीता आहुजा यांच्यासह दुसऱ्यांदा परळीत आलेल्या अभिनेता गोविंदा यांनी २१ वर्षांपूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे यांनी आपल्याला परळीला आणले होते, आज पुन्हा २१ वर्षांनी परळीत आलो, इथल्या लोकांचे धनंजय मुंडे यांच्यावरील प्रेम पाहून धनंजय मुंडे यांचे व्यक्तिमत्त्व आणखी मोठे होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी धनंजय मुंडे यांनीही आता पुन्हा तुम्हाला परळीत बोलवायला २१ वर्षे लागणार नाहीत असे म्हणत गोविंदा यांच्यासह मंचावरील सर्वच उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. गोविंदा-धनंजय मुंडे यांच्या भाषणातील जुगलबंदी, कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन यावरून उपस्थितांनी टाळ्या व शिट्या व हातवारे करून मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट, माजी आमदार पृथ्वीराज साठे, गोविंद देशमुख, वाल्मिक अण्णा कराड, सोमनाथ आप्पा हालगे, बाजीराव धर्माधिकारी, अजय मुंडे, लक्ष्मणराव पौळ, डॉ. मधुकर आघाव, दीपकनाना देशमुख, अॅड. गोविंदराव फड, शकीलभाई कुरेशी, शरद मुंडे, अजीज कच्छी माऊली तात्या गडदे, भाऊसाहेब कराड, माणिकभाऊ फड, चेतन सौंदळे, सूर्यभान नाना मुंडे, राजेश्वर आबा देशमुख, दत्ता आबा पाटील, राजपाल लोमटे, विलास सोनवणे, रणजित चाचा लोमटे, पिंटू मुंडे, शिवाजी सिरसाट, चंदूलाल बियाणी, रामेश्वर मुंडे, अभय मुंडे, प.स. सभापती सौ. उर्मिलाताई गित्ते, संगीता ताई तुपसागर, अर्चनाताई रोडे, पल्लवी भोईटे, यांसह सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी व मोठ्या संख्येने परळीकर नागरिक उपस्थित होते. संचलन प्रा. डॉ . विनोद जगतकर यांनी केले, आभार नितीन कुलकर्णी यांनी मानले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser