आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताह साजरा:बीड येथील सावरकर माध्यमिक‎ विद्यालयात फिट इंडिया सप्ताह साजरा‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाच्या फीट इंडिया मोहीमे अंतर्गत १५‎ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान फीट इंडिया सप्ताह‎ साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने स्वा.‎ सावरकर माध्यमिक विद्यालयात फीट इंडिया सप्ताह‎ साजरा करण्यात आला.

यावेळी बीड येथील उत्तरेश्वर‎ सपाटे यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करण्यात‎ आले होते. यावेळी सपाटे व त्यांच्या प्रशिक्षणार्थी‎ विद्यार्थ्यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कराट्याची‎ प्रात्यक्षिके करून दाखवली. अध्यक्षीय समारोप‎ करताना पर्यवेक्षक दत्तात्रय तांबारे यांनी केला. अभ्यास‎ पूरक प्रमुख सुजाता चिंचपूरकर, क्रीडा शिक्षक‎ शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक हरिभाऊ साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन‎ शरद ढवळे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...