आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागात दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत, दलितेत्तर, आणि विशेष रस्ता अनुदान अंतर्गत सिमेंट रस्ते आणि नाल्यांची कामे सुरू आहेत. शहरातील माळीवेस भागातील सटवाई मैदान, धानोरा रोड भागातील राजीव नगर येथे देखील सिमेंट रस्ते, नाल्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. बीड शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नातून मंजूर करून आणलेली विकास कामे सुरू आहेत. त्यातीलच माळीवेस भागातील सटवाई मैदान आणि धानोरा रोड भागातील राजीव नगर येथे रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण व नाल्यांच्या कामांना सुरुवात झाली आहे. या सुरू झालेल्या कामांच्या ठिकाणी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी भेट देत पाहणी केली व कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी स्थानिकांंशी विविध विषयांवर संवाद साधला. डॉ. क्षीरसागर म्हणाले, विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी खूप अडचणी येतात. मात्र तरीही शहर वासियांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यासाठी प्रयत्न सतत सुरूच असतात.
शहरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील असतो. त्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असतो. यावेळी धानोरा रोड परिसरात असणाऱ्या राजीव नगर येथे भीमराव वाघचौरे, विलास विधाते, भैय्या मोरे, रणजित बनसोडे, इक्बाल शेख, मुखीद लाला, डॉ.रमेश शिंदे, मनोज मस्के, नितिन लोखंडे, विठ्ठल गुजर, शालिनी परदेशी, अविनाश शिंगनाथ, बळीराम वराट, प्रा.अमोल वाघमारे, डॉ.मधुकर जाधवर, दिशांत मोराळे, काझी सईद, हजू भाई, फारूक शेख, राफत शेख, कैफ शेख, अकबर भाई, मोहसीन बेग, सय्यद वजीद अली, शेख नाझीर, इम्रान शेख, शेख अन्सर, लतीफ खान, हिमायू कबीर, स्टीव्हेन रेड्डी, गिमी रेड्डी, इम्रान तर माळीवेस भागातील सटवाई मैदान येथे नितिन साखरे, कैलास लगड, सनी आठवले, किरण बेदरे, निखिल शिंदे, अमर विद्यागर, चंद्रकांत वडमारे, लक्ष्मण गुंजाळ, अजय जाधव, विजय जाधव, शाम साखरे, धनंजय राऊत, सौरभ कांबळे उपस्थित होते.
विरोधामुळे विकासकामांना अडथळा
डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, मागील काही काळात विरोधकांनी विकास कामांना केलेल्या विरोधामुळे विकासकामे मार्गी लागत नव्हती. मात्र, आता या कामांना गती मिळाली असून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्त्यांची आणि नाल्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महिन्याभरात ही कामे पूर्ण होतील या भागातील उर्वरित कामांसाठी पाठपुरावा करून ते देखील लवकरच मार्गी लावू व नागरिकांच्या अडचणी दूर करू असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी याप्रसंगी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.