आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआईच्या स्मरणार्थ आनंदगाव ( ता. केज ) येथे डॉ. हनुमंत सौदागर यांनी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता करून स्वखर्चाने ट्रॅक्टरच्या मदतीने परिसर नीटनेटका करून घेतला. शिवाय अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बँच भेट दिला आहे. ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. केज तालुक्यातील आनंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. हनुमंत सौदागर यांनी त्यांच्या मातोश्री स्व. कमलबाई बिरुदेव सौदागर यांच्या स्मरणार्थ गावातील सार्वजनिक स्मशानभूमीच्या परिसराची स्वच्छता केली. तर स्वखर्चातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने परिसर ही नीटनेटका करून घेतला. वाढलेल्या झाडांची छाटणी करून झाडांना योग्य आकार दिला.
तर या सामाजिक कार्यात गावातील तरुणांनी श्रमदान करीत मदत केली. सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंट बँच ( बाकडा ) बसवण्यात आला. त्यांचा आदर्श घेत गावातील राऊत परिवाराने स्व. पुतळाबाई राऊत व स्व. कालिंदाबाई राऊत यांच्या स्मरणार्थ दोन सिमेंट बँच ( बाकडा ) भेट देण्यात आले. येणाऱ्या काळात लोकसहभागातून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करीत रूप बदलण्याचा आणि शांतीधम करण्यासाठी सहकार्य मिळत असल्याचे ही डॉ. हनुमंत सौदागर यांनी सांगितले. तर अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम हाती घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.