आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारूर:धारूरला पारंपरिक गाणी म्हणत निघाली ‘चाचर’

धारूर2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

धुळवडीच्या दिवशी धारूर शहरात राजपूत समाजाच्या वतीने चाचर काढण्यात आली. शुक्रवारी कटघरपुरा भागातील हनुमान मंदिरापासून पेठेतील मुख्य रस्त्याने चाचर काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते

‘तुम जिओ तो खेले फिर होली, सदा आनंद रहे द्वारा, मोहन खेले होली हो’ याचबरोबर “एक धर्मवीर बलिदान हुआ, पापा सिंगने नाम किया, लक्ष्मण सिंगने नाम किया, एक धर्मवीर बलिदान हुआ” अशा गीतातून शहिदांच्या स्मृतीला उजाळा देणारी गाणी ढोलकी, झांज वाद्यांवर सादर करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण करण्यात आली. चाचरमध्ये माजी नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्यासह ज्येष्ठ मंडळी सहभागी झाले होते. दुपारी २ वाजता चाचरीचा समारोप करण्यात आला. कोरोनाच्या दोन वर्षानंतर चाचरीमध्ये यंदा उत्साह दिसून आला. नाेकरीनिमित्त बाहेर असलेले समाजबांधव चाचरीत सहभागी होते. पुढील पाच दिवस ही चाचर निघणार आहे. धारूरमध्ये होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंग उधळण्याचे काम दररोज एका कुटुंबाकडून केले जाते. यात पहिल्या दिवशी दुबे, दुसऱ्या दिवशी तिवारी कुटुंबाने रंग व ठंडाईची सोय केली होती. धारूर शहरात कोरोनानंतर दोन दिवस चाचरीमध्ये मोठा उत्साह होता. मुले, ज्येेष्ठांसह नोकरदार मंडळी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...