आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालगृह:बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आज बीड जिल्ह्यात ; गर्भपात प्रकरणाचीही घेणार माहिती

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचआयव्हीने बाधित पालकांच्या मुलाला खासगी इंग्रजी शाळेने प्रवेश नाकारल्याचा प्रकार “दिव्य मराठी’ने समोर आणला होता. याप्रकरणी राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्य शनिवारी (ता. २७) बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते शाळेला भेट देऊन चौकशी करणार आहेत. सोबतच बकरवाडी येथील अवैध गर्भपात प्रकरणात मृत महिलेच्या मुलींचीही भेट घेणार आहेत. तसेच जिल्हा शासकीय बालगृहालाही भेट देण्याची शक्यता आहे.

एचआयव्हीनेे बाधित पालकाच्या निगेटिव्ह असलेल्या पाच वर्षीय मुलाला खासगी इंग्रजी शाळेने प्रवेश दिला. मात्र, त्याचे पालक एचआयव्हीग्रस्त असल्याचे समजल्यानंतर शाळेने मुलाला वर्गात बसण्यास मज्जाव केला होता, तर मुलाला शाळेत न पाठवण्यासाठी पालकांवर दबाव आणला होता. याप्रकरणी इन्फंट इंडिया प्रकल्पाचे दत्ता बारगजे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. शनिवारी बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, सदस्य अॅड. प्रज्ञा खोसरे, अॅड. संजय संेगर, चैतन्य पुरंदरे, नितीन चव्हाण, सायली पालखेडकर या चौकशी करणार आहेत. बकरवाडी (ता. बीड) येथे गर्भलिंगनिदान करून गर्भपात करताना शीतल गाडे या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करून गाडे यांच्या मुलीची भेटही आयोगाचे सदस्य घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...