आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाची ताकद:शैक्षणिक कर्जासाठी मारल्या चकरा, आता बँकेतच ज्युनियर असोसिएट!

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने १ लाखाच्या शैक्षणिक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवून कर्ज मिळवलेले चांद फकीर पठाण हे आता स्वत:च बँक अधिकारी झाले आहेत. आपल्या पदाच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

बनसारोळा (ता. केज) येथील चांद पठाण यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. बारावीपर्यंत अंबाजोगाईच्या योगेश्वरी महाविद्यालयात शिकले. वडील फकीर पठाण हे टेलरिंग व मळणी यंत्र चालवतात तर आई शहनाज या गृहिणी आहेत. बारावीनंतर चांद यांची पुणे जिल्ह्यात अभियांत्रिकीसाठी निवड झाली. मात्र, फीससाठी पैसे नव्हते. या वेळी शैक्षणिक कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला. १ लाखाच्या कर्जासाठी अनेकदा बँकेचे उंबरठे झिजवावे लागले. याच कर्जातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. इंजनिअरिंग करत असतानाच शेवटच्या वर्षी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू ठेवला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतरही समाधानकारक क्षेत्र मिळत नव्हते. दुसरीकडे शैक्षणिक कर्ज घेतले होते ते फेडणे क्रमप्राप्त होते. तेव्हा त्यांनी बँक अधिकारी व्हायचे ठरवले. चांद यांनी अवघ्या दुसऱ्या प्रयत्नात स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षेत यश संपादन केले. स्टेट बँक ऑफ इंडिया अंबाजोगाई प्रशांतनगर या शाखेत त्याची ज्युनियर असोसिएट म्हणून नुकतीच नियुक्ती झाली.

बातम्या आणखी आहेत...