आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दावा:उदय सामंत उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, चंद्रकांत खैरे यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गटात सामिल झालेले उदय सामंत हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत असा दावा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

११ महिन्यांनंतर राज्यातील सत्तासंघर्षावर आज काय निकाल लागणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. शिंदेंची सत्ता राहणार की जाणार याबाबत टांगती तलवार असताना खैरेंनी हा दावा केला.

काय म्हणाले खैरे?

खैरे म्हणाले, उदय सांमंत हे स्वत: उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण, ते सर्वात शेवटी शिंदे गटात गेले होते. त्यामुळे 16 अपात्र आमदारांमध्ये उदय सामंत यांचा समावेश नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिंदे गटातील अनेक आमदार फुटणार असून ते पुन्हा आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती असेल हे माहित नाही परंतु, उद्धव ठाकरे यांच्यांच बाजूने निकाल लागेल असा विश्वासही खैरेंनी व्यक्त केला.

त्यांची मस्ती रिकामी होईल

खैरे म्हणाले, मी हिंदुत्ववादी असले तरी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही पण देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा उद्धवजींच्या बाजूने लागू दे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं? जे मस्तीत वागत होते, उद्धव साहेब, आदित्य साहेब, संजय राऊत साहेब यांना काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

आज त्यांचा फुगा फूटणार

खैरे म्हणाले, आम्ही आशावादी असून, परमेश्वर निश्चितच आम्हाला न्याय देणार आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यात यांचे जे काही प्रकरणे अतिशय गलिच्छ होती. कोण काहीही बडबड करत आहेत. शिंदे गटाचे लोक छाती फुगवून चालत होते. मात्र आज त्यांचा फुगा फुटणार आहे.