आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅनलची बाजी‎:सेवा सहकारी‎ सोसायटीत सत्ता परिवर्तन; गीतादेवी शेतकरी सेवा‎ सहकारी पॅनलची बाजी‎

अंबाजोगाई‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तडोळा सेवा सहकारी‎ सोसायटीत सत्ता परिवर्तन झाले‎ असून अंबाजोगाई खरेदी विक्री‎ संघाचे व्हाईस चेअरमन वसंत कदम‎ यांच्या नेतृत्वाखालील श्री गितादेवी‎ शेतकरी सेवा सहकारी पॅनलच्या‎ सर्वच्या सर्व उमेदवारांनी चांगली‎ मते घेऊन विजय संपादन केला.‎ तडोळा सेवा सहकारी सोसायटी‎ करीता १५ जून रोजी मतदान झाले‎ होते.

या निवडणुकीत श्री गितादेवी‎ शेतकरी सेवा सहकारी पॅनलमध्ये‎ विजयी उमेदवारांमध्ये सर्वसाधारण‎ कर्जदार गटातून वसंतराव बप्पाजी‎ कदम, राजाभाऊ माणिकराव कदम,‎ अशोक बंकटराव कदम, हनुमंत‎ भाऊराव कदम, उत्तम नामदेव‎ कदम, बाबासाहेब बंकट कदम,‎ शामसुंदर गोपाळ कदम, दत्ताञय‎ अमृत जगदाळे, महिला राखीव‎ गटातून उषाबाई सुदामराव कदम,‎ प्रतिभा बळीराम कदम, मागासवर्गीय‎ गटातून बबूवान रखमाजी काटे,‎ अनुसूचित जाती जमाती गटातून‎ अमोल उध्दव आडसूळ, अविनाश‎ नामदेव पुजारी यांचा समावेश आहे.‎ या विजयी उमेदवारांच्या निवडीचे‎ ग्रामस्थांनी स्वागत केले

बातम्या आणखी आहेत...