आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन कौशल्य विकास:विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये कौशल्य प्रशिक्षणातून बदल

बीड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयात जी टी टी फाउंडेशन व आदर्श गणेश मंडळ यांच्या विद्यमानाने तीन दिवसीय “जीवन कौशल्य विकास रोजगार सक्षमता प्रशिक्षण” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेचा समारोप शनिवारी महाविद्यालयाच्या सॅम्युअल हॅनिमन सभागृहात झाला. प्रसंगी जीटीटी फाउंडेशनचे औरंगाबाद विभाग प्रमुख रवींद्र बोराडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बोराडे म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात व्यावसायिक नीतिमूल्य जाणीवपूर्व जोपासून सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजे. स्वजाणीव, ध्येयनिश्चिती, संभाषण कौशल्य, श्रवण कौशल्य इत्यादींसह वेळेचे व्यवस्थापना बाबत प्रात्यक्षिकासह माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.महेंद्र गौशाल होते. तर व्यासपीठावर जीटीटी फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी प्रवीण पवार, प्रशिक्षक समन्वयक आकाश बोधक, प्रशिक्षक शेख अजहर, उपप्रचार्य डॉ. गणेश पांगारकर, व्यवस्थापक डॉ.वैभव शहापुरे, डॉ.नवाज शेख, गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय गिरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आशुतोष जोजारे, संजना शेवंते, शेख अयाज, शहाबाज खान, मयंक यादव, पृथ्वीराज मरकड, जयश अतकरे, ओमप्रकाश भोसले, अक्षय दळवी, प्रियंका मुंडे, आकाश टकले, विजय गोपाळघरे, गणेश कादे, प्रफुल्ल काकडे, यश देशमुख, विशाल लगड, धनंजय तागड, ऋतुजा जगदाळे, प्रियंका पांडे, गायत्री बडे, ऋषिकेश जेथलिया, सुशांत घाडगे, शितल तुपे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...