आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन:उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा अनागोंदी कारभार; परिवहनमंत्र्यांना पत्र

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अत्यंत अनागोंदी कारभार सुरू असून सकाळचे १२.३० वाजले तरी एकही कर्मचारी कार्यालयात हजर होत नसून दिवसाचे फक्त ०३ ते ०४ तास काम करून सदर कर्मचारी पळ काढत आहेत. त्यामुळे लोकांच्या कमांना वेळ लागत असून ७ दिवसांत होणाऱ्या कामासाठी तब्बल ३ ते ४ महिने थांबावे लागत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी आमदार नमिता मुंदडा यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार केली आहे.

अंबाजोगाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कामाचा वाढता ताण पाहता शासनाने या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना सहकार्य करण्यासाठी ४ मोटार वाहन निरीक्षक, ८ सहायक मोटार वाहन निरीक्षक, कार्यालयीन कामासाठी ५ ते ६ क्लर्क व अधिकाऱ्यांना क्षेत्राअंतर्ग फिरण्यासाठी एक कायमस्वरूपी व एक कंत्राटी वाहन चालक अशी नियुक्ती केलेली आहे . परंतु एवढा स्टाफ उपलब्ध असूनही दुपारी एक वाजेपर्यंत कर्मचारी कार्यालयात येत नसल्याने नागरिकांना ताटकाळत बसावे लागत आहे. याबाबतीत कोणाचेही नियंत्रन नसल्याचे दिसून येत आहे .

तसेच या कार्यालयातील ४ ही मोटार वाहन निरीक्षक हे बाहेर जाताना आपल्या सोबत कायमस्वरूपी सेवेत असलेल्या वाहन चालकाला न घेता कंत्राटी वाहन चालकाला सोबत घेतात व सदर कंत्राटी चालका मार्फत मोठ्या प्रमाणात महामार्गावर अवैध वसुली केली जात असून लाईन वरील वाहन चालकाकडून दरमाह लाखो रुपये हप्ता वसूल केला जात असल्याच्या तक्रारी असून या बाबत विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होत आहेत .

सदर कंत्राटी वाहन चालक हा आर टी ओ कार्यालयाचा बँच लाऊन व गणवेश घालून खुलेआम वाहन चालकाकडून हप्ते वसूल करत आहे . त्यामुळे सदर कंत्राटी चालकाच्या मोबाईलचा सी.डी. आर . तपासला तर मोठ्याप्रमाणात घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. तरी वरील प्रकरणाची त्वरित चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...