आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:चार आंदाेलने : जिल्हा कचेरी विविध मागण्यांच्या घोषणांनी गेली दणाणून

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आराेपींची शिक्षा माफ केल्याच्या निर्णयाविरुद्ध चले जाव धरणे आंदोलन, जमिनीवरील अतिक्रमण राेखण्यासाठी उपाेषण, फसवणूक करणाऱ्या महिलेच्या अटकेसाठी निदर्शने आणि इन्फंट इंडिया प्रकल्पातील विद्यार्थ्यांचे सत्याग्रह आंदाेलन अशी ४ आंदोलने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर करण्यात आली.

आरोपींना दिलेला माफी निर्णय रद्द करावी : बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणातील आरोपींना दिलेली माफी निर्णय रद्द करून आरोपींची कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवावी, या मागणीसाठी व गुजरात सरकार व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी ११ वाजता लोकसेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. इलियास इनामदार यांच्या मार्गदर्शनात चले जाओ (धरणे) आंदोलन केले. या आंदाेलनात जिल्हाध्यक्ष सुफियान मणियार, तालुकाध्यक्ष अतिक खान, शहर अध्यक्ष शेख अयाज यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते.

मारेकऱ्यांपासून संरक्षणासाठी धिवार कुटुंबाचे उपोषण : बीड शहरातील इमामपूर राेडवरील प्रकाश आंबेडकरनगर भागातील माेतीराम धिवार यांच्या आईच्या नावे सर्व्हे नंबर १०५ पिंगळे तरफ मिळकत क्र. ८२ आहे. या गायरान जमिनीवर २० बाय ५० फुटांचे अतिक्रमण झाले आहे. तसेच मारहाण केली. मारेकऱ्यांपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी धिवार कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे.

फसवणूक करणाऱ्या महिलेला हद्दपार करा
बीड शहरातील माेमीनपुरा भागातील रहिवासी शेख नाजिया या महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्या महिलेने दाखल केलेले गुन्हे आणि इतर कारवाईमुळे हद्दपार करावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर गुरुवारी निदर्शने आंदाेलन केले. या वेळी जवळपास २३ लोक सहभागी झाले.

दत्ता बारगजेंचे सत्याग्रह आंदोलन पुन्हा सुरू
पालक एचआयव्हीग्रस्त असल्याने त्यांच्या ५ वर्षीय निगेटिव्ह मुलाला एका खासगी इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी मज्जाव हाेत आहे. राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांनीही २ दिवसांपूर्वी शाळेला भेट दिली होती. मात्र, ही भेटही निष्फळ ठरली आहे. मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न कायम असल्याने इन्फंट संस्थेचे दत्ता व संध्या बारगजे यांनी स्थगित केलेले सत्याग्रह आंदोलन सोमवारपासून पुन्हा सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...