आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:चौसाळा ग्रा.पं. निवडणूक 4‎ पॅनलमधून लढवली जाणार‎

चौसाळा‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौसाळा (ता.बीड) येथील ग्रामपंचायत‎ निवडणूक या वर्षी गावातील चार पॅनलमधून‎ मोठ्या चुरशीने लढविली जात आहे.‎ सरपंचपदाच्या उमेदवारांसह इतर‎ उमेदवारांनीही आपले नशिब आजमावले‎ आहे. त्यामुळे यंदा जनता कोणाला संधी‎ देणार हे पाहणे अतिशय औत्सुक्याचे‎ असणार आहे.‎ चौसाळा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच‎ पदासाठी पाच महिला उमेदवार निवडणूक‎ लढवत आहेत.

तर सदस्य पदासाठी‎ जवळपास पन्नास उमेदवार निवडणुकीत‎ उभे आहेत. या निवडणुकीत एकूण चार‎ पॅनल रिंगणात आहेत. यामध्ये चौसाळा शहर‎ विकास पॅनल, ग्रामविकास पॅनल, युवा क्रांती‎ पॅनल, प्रगती पॅनल आदी पॅनल आपापले‎ पॅनल उभा करून निवडणूकीला सामोरे जात‎ आहेत. गावातील एका कार्यकर्त्यांने लढा‎ धनशक्ती विरुद्ध जण शक्तीचा या नावाने‎ सरपंच पदासाठी उमेदवारी जाहीर करून‎ प्रचाराचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे‎ यंदाची निवडणूक मोठ्या चुरशीने लढविली‎ जात असून जनतेकडे उमेदवार कौल मागत‎ असल्याचे चित्र दिसत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...