आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आज 59 ग्रामपंचायतीत होणार चावडी वाचन

पाटोदा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदारांच्या मतदान अोळखपत्रांना आधार क्रमांक जोडणीत पाटोदा तालुक्यात १ लाख २ हजार ९३ मतदारांपैकी ८१ हजार १४ मतदारांची आधार जोडणी पूर्ण झाल्याने ७९.६२ काम पूर्ण झाले असुन उर्वरीत २० हजार ७३९ मतदारांची आधार जोडणी पूर्ण केली जात आहे. गुरवार १० नोव्हेंबर रोजी तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचन होणार आहे.

तालुक्यात ५९ ग्रामपंचायती अंतर्गत गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असुन यात चावडी वाचन उपक्रम होत असुन यात मतदारयादी वाचन आधार जोडणीची माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीत सकाळी ९ वाजता ग्रामसभा सुरु होणार आहे. कार्यक्रमास तलाठी, बीएलओ उपस्थित राहणार आहेत. तालुक्यात एकूण मतदारांची संख्या १ लाख २ हजार ९३ असून त्यापैकी ५४ हजार २७५ पुरुष मतदार तर ४७ हजार ८१८ स्त्री मतदारांची संख्या आहे.

मतदार आधार जोडणी गतीने सुरू असुन आत्तापर्यत तालुक्यात ७९. ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. आज ५९ ग्रामपंचायती अंतर्गत विशेष ग्रामसभा व चावडी वाचन आयोजन करण्यात आले आहे. नवीन मतदार नोंदणीही सुरु झाली आहे. या प्रक्रीयेत निकषात बसणाऱ्या सर्वांनी आपली नोंदणी करावी असे तहसीलदार रूपाली चौगुले यांनी सांगितले.

नवीन मतदार नोंदणी सुरू
पाटोदा तालुक्यात बुधवार ९ नोव्हेंबर पासुन नवीन मतदार नोंदणीला सुरुवात झाली असुन छायाचित्रांसह मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण अंतर्गत नवीन मतदाराला आपले नाव समाविष्ट करता येणार आहे. तालुक्यातील १२० मतदान केंद्रांसाठी १२० बीएलओची नेमणूक केली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांनी वयाचा पुरावा, टीसी, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो या कागदपत्रासंह बीएलओ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन तहसीलदार रुपाली चौगुले, नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी केले आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...