आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृती समारोह:अंबाजोगाईत आजपासून चव्हाण स्मृती समारोह

अंबाजोगाई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह आयोजीत केला जात असुन यंदाचे ३८ वे वर्ष आहे. तीन दिवसीय कार्यक्रमात कवी संमेलन, बालआनंद मेळावा, शास्त्रीय संगीतात शास्त्रीय गायन जुगलबंदी, स्मृती पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या समारोहाचे जेष्ठ लेखक पानीपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

अंबाजोगाईत आज २५ नोव्हेंबर २०२२ पासून यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहास सुरूवात होत असुन येत्या २७ नोव्हेंबर २०२२ विविध कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वा. या समारोहाचे उद्घाटन मुंबई येथील प्रख्यात लेखक व माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. रात्री ८.३० वाजता कवी संमेलन होणार असुन संमेलनाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर हे उपस्थित राहणार आहेत.

कवी संमेलनाचे सूत्रसंचालन औरंगाबाद येथील कवी निलेश चव्हाण हे करणार आहेत. कवी संमेलनात सुप्रसिध्द कवी रवींद्र महल्ले-अकोला, मालती सेमले-गडचिरोली, डॉ. अनिता खेबुडकर- निपाणी (कर्नाटक), इरफान शेख - चंद्रपूर, राजेंद्र वाघ-पुणे, धम्मपाल जाधव-हिंगोली, गुंजन पाटील-सोयगाव हे सहभागी होणार आहेत. बाल आनंद मेळावा शालेय चित्रकला स्पर्धा, शेतकरी परिषद यांचे आयोजन करण्यात आले आहे.

यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्काराचे वितरण
मराठवाड्यातील प्रगतशील शेतकरी पंजाबराव देशमुख, साहित्यिक इंदुमती जोंधळे, संगीत गायक सूरमणी बाबूराव बोरगावकर , तरुण शिल्पकार प्रदीप जोगदंड, रजनी वर्मा यांना रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राम कांडगे यांच्या हस्ते यशवतराव चव्हाण स्मृती पुरस्कार देवुन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...