आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक:‘मातोश्री’त फसवणूक; संचालक अद्याप फरार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन महिन्यांपासून टाळे लागलेल्या शहरातील मातोश्री महिला नागरी पतसंस्थेविरुद्ध अखेर ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी बीड शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या पतसंस्थेच्या संचालक आणि अध्यक्ष यांनी संगनमत करून ठेवीदारांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अद्याप कुणाला अटक केलेली नाही.

याबाबत विद्याधर विश्वनाथ वैद्य (रा. अमृत प्लाझा, रेल्वेस्टेशन, औरंगाबाद) यांनी तक्रार नोंदवली. त्यानुसार शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स भागातील मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या योगेश विलास स्वामी आणि इतर संचालक मंडळ तसेच लिपिक जयश्री दत्तात्रय मस्के ऊर्फ जयश्री भास्कर कोकाटे (सर्व रा.बीड) या लोकांनी मातोश्री पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवीवर १४.५० टक्के इतके आकर्षक व्याजदर देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर ठेवीदारांनी पतसंस्थेमध्ये जमा केलेल्या फिक्स डिपॉझिटचे प्रमाणपत्र तयार करून दिले. मात्र, मुद्दल व व्याजाचे पैसे न देताच पतसंस्थेला कुलूप लावून ती पतसंस्था बंद करत ठेवीदारांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक निरीक्षक घनश्याम अंतरप करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...