आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:पीक नुकसानीचे पंचनामे करा, शेकापचे रास्ता रोको

माजलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शनिवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने छोटीवाडी फाट्यावर दीड तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अॅड. नारायण गोले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा लागू करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, रासायनिक खताच्या किमतीत केलेली भरमसाठ भाव वाढ रद्द करा, आदी मागण्यासाठी हे आंदोलन केले. या वेळी वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनासाठी छोटीवाडी, मोठेवाडी, गंगामसला, रामनगर, आबेगाव, छत्र बोरगाव पंचक्रोशीतील शेकडो शेतकऱ्यांसह मुंजा पांचाळ, गणेश कदम, विष्णू शेळके, संभाजी चव्हाण, राजाभाऊ घोडके, पांडुरंग गोंडे, सुदर्शन हिवरकर, अनंतराव शिंदे, राहुल सोळंके, राधाकृष्ण इंगळे, विद्यासागर करपे, गणेश यादव, भरत किनोळकर, विलास जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...