आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आष्टी:"बिबट्याला ठार मारण्यासाठी पारितोषिक जाहीर करु नका" या अटीने प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या आदेशाला पंगुत्व आले आहे : आमदार सुरेश धस

आष्टीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद अहमदनगर, बीड व सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक बिबट्याला मनुष्यहानी टाळण्याच्या दृष्टीने ठार मारण्याचे आदेश राज्य वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी ६ डिसेंबर २०२० रोजी आदेश जारी केला आहे. परंतु या आदेशामधे सदर बिबट्याला ठार मारण्यासाठी कोणतेही पारितोषिक जाहीर करु नये. असे म्हटले आहे. जे लोक नियमानुसार बिबट्याला ठार मारण्याचे काम करतात ते अधिकृत करार केल्याशिवाय या कामासाठी समोर येणार नाही. त्यांची साधनसामग्री, येण्या-जाण्याचा खर्च दिला पाहिजे. सदरीच्या आदेशाला या ओळीळीमुळे पंगुत्व आलेले आहे, हे माझे स्पष्ट मत असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. आत्ताच कळलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी अकरा वाजता करमाळा तालुक्यात चिकलठाण येथे नंदूरबार जिल्ह्यातील उसतोड कामगाराची नऊ वर्षीय मुलगी फुलबाई तारचंद कोटली (मु .पो. दुसानी. ता साक्री) ही बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली असून हा नरभक्षक बिबट्या किती हिंस्र आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नरभक्षक बिबट्या सापळ्यात अडकत नाहीये. असेही आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser