आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांची माहिती:मुख्यमंत्री जिल्हास्तरावरील कामांची निवेदने घेणार

बीड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. त्या अनुषंगाने आता बीड जिल्ह्यात सत्कार-सोहळे न करता थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे असलेल्या कामांची नागरिकांची निवेदने स्वीकारणार असल्याचे शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी जाहीर केले आहे. त्या कामांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास दाखवत शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. माझ्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शेकडो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिंदे गटात जाहीर प्रवेश झाले. लवकरच या पदाधिकाऱ्यांना देखील जबाबदारी दिली जाणार आहे. या नवनियुक्तीच्या अनुषंगाने सत्कार-सोहळे न करता बीड जिल्ह्यातील नागरिकांची मुख्यमंत्री कार्यालयाकडे असलेल्या कामांची निवेदने स्वीकारून सोडवणूक करणार आहे.अशा पद्धतीने नव्या जबाबदारीनंतर कामाची सुरुवात केली जात असून निवेदनकर्त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार आहे. संबंधितांनी निवेदने सादर करावीत, असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू असल्याने अनेक नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. त्यांना मुंबईकडे जाण्याची आवश्यकता भासणार नसून पैसा व वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेली निवेदने स्वीकारून तातडीने सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी म्हटले आहे.जनसेवेने करणार कामाला सुरुवात नव्याने मिळालेल्या जबाबदारीबद्दल सत्कार सोहळे न करता जनसेवेने कामाला सुरुवात करण्याचा निर्धार सचिन मुळूक यांनी केला आहे. जनसेवेच्या माध्यमातूनच येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...