आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजलगाव शहराजवळून वाहणाऱ्या सिंदफणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
माजलगाव शहरातील पाटील गल्ली येथील वलिद नासेर चाऊस (१५) हा किशोरवयीन मुलगा सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी सिंदफणा नदीपात्रात गेला होता. मात्र तो बुडाला. याची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी सिंदफणा पात्रात शोधमोहीम राबवली. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, बुडून मृत्यू झाल्याने पाटील गल्ली व परिसरावर शोककळा पसरली होती.
स्टिकफास्टच्या बाटल्या आढळल्या : वलिद नासेर चाऊस हा ज्या ठिकाणी बुडाला त्या ठिकाणी त्याची चप्पल, कपडे आणि स्टिकफास्टच्या काही बाटल्या आढळून आल्या. किशोरवयीन मुलांमध्ये स्टिकफास्टच्या साहाय्याने नशेचे प्रमाण वाढत असल्याने व त्या ठिकाणी रिकाम्या बाटल्या सापडल्याने तर्कवितर्क लावून चर्चा सुरू होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.