आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बालविवाह स्त्री विकासातील अडसर; डॉ. सोनिया हंगे यांचे प्रतिपादन

अंबाजोगाई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालविवाह स्त्रीच्या व्यक्तीमत्व विकासातील मोठा अडसर आहे. बालविवाहामुळे अनेक समस्या निर्माण होतात, बालविवाह रोखणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक कार्यकर्त्या सोनिया हंगे यांनी केले.

येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी व कमल खुरसाळे स्मृती न्यास.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आत्मभान शिबीरात सोनिया हंगे यांनी आपली भूमिका मांडली. बालविवाहामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, सामाजिक समस्या निर्माण होतात हे सोनिया हंगे यांनी नमूद केले. समाजातील प्रागतिक विचारांच्या नागरिकांनी ही प्रथा संपुष्टात आणण्यासाठी भरीव प्रयत्न केले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या सहसचिव यशोदा राठोड यांच्या संबोधनाने झाला. मुलींना, स्त्रीयांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल असे मत व्यक्त केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेने या साठीच असे कार्यक्रम राबविले आहेत असे प्रतिपादन राठोड यांनी केले.

सूत्रसंचालन सायली जाधव हीने केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शिवानी हारे हीने केले. संस्थेचे सहसचिव प्रा. एन. के. गोळेगावकर, मुख्याध्यापक एस.के. निर्मळे, सह संयोजिका लोखंडे, मेजर एस. पी. कुलकर्णी, शिक्षकवृंद व शिबिरार्थी मुली उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...