आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांसाठी खेळ हा शिक्षणाचाच एक भाग असून खेळातून संघटन कौशल्य विकसित होत असते तसेच खेळामुळे मुलांमध्ये कुठलेही आव्हान पेलण्याचे सामर्थ्य निर्माण होते. यात जय पराजयाला सहजपणे सामोरे जाण्याचे कसब प्रत्येकाला मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आवडीच्या खेळात सहभाग घेतलाच पाहिजे, असे प्रतिपादन सहायक पोलिस निरीक्षक योगेश खतकळ यांनी केले. माजलगांव येथील फ्लाइंग बर्डस अकॅडमी या शाळेत २ ते ७ जानेवारी २०२३ दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन खतकळ यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाटवडगावचे सरपंच कुटे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बँक अधिकारी गजानन चिद्रवार, आशिष शर्मा, सरवदे, फ्लाइंग बर्डसचे स्टार स्टुडंट्स पालक तसेच पोलीस कर्मचारी ईत्यादी उपस्थित होते.
व्यासपीठावर अध्यक्ष पांडुरंग चांडक, संचालक प्रभाकर शेटे, भगवान लाटे, शेख अलीपटेल, प्राचार्या सारिका बजाज, उपसरपंच शेख जमील, पोलीस कर्मचारी तुकाराम ढोबळे, विलास इचके इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील छोट्या विद्यार्थिनी अनुराधा बाहेती, वेदिका टोकलवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक, सहशिक्षिका, क्रिडा शिक्षक व कर्मचारी ईत्यादीनी विशेष परिश्रम घेतले.
खेळामुळे माणूस निरोगी, सदृढ राहण्यास मदत आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांच्या अंगात विविध कलाकौशल्ये असणे आवश्यक आहे. क्रीडा स्पर्धांतील सहभागामुळे विद्यार्थी निपूण बनतो. शरीरयष्टी बळकट होते व निरोगी राहण्यासही मदत मिळते, असे प्रतिपादन भाटवडगावचे सरपंच कुटे यांनी केले. याप्रसंगी गजानन चिद्रवार, आशिष शर्मा यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.