आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक मानवी सांस्कृतिक मूल्ये बदलत नाहीत. काळ बदलण्यासाठी किंवा यातून वेगळेपण निर्मितीसाठी बाल मनांनी मोकळे व्हायला, हवे असे प्रतिपादन बालकुमार लेखक संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीला शिंदे यांनी केले.बालकुमार लेखकांशी गप्पा या सत्रात बालकवींनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.
सूत्रसंचालन प्रा.गोवर्धन मुळक यांनी केले. लीला शिंदे यांनी बालकांना प्रेम या शब्दाची व्याख्या समजावून सांगितली. बाल कवी म्हणून मागील महिन्यात झालेल्या स्पर्धेत येथील दत्तासाहेब देशमुख विद्यालय, सरस्वती भुवन विद्यालय कुंभार पिंपळगाव, जिल्हा परिषद प्रशाला रामगव्हाण, जिल्हा परिषद प्रशाला वडीरामसगाव, जि. प. शाळा शेवता, सरस्वती भुवन रांजणी या शाळेतील कवींचा गौरव करण्यात आला.
बाप शेतकरी माझा.. राग पांढरी मानतो.. बालकवी राजेंद्र अत्रे यांनी बाप शेतकरी माझा .. राग पांढरी मानतो.. माती माता रखुमाई कष्ट विठ्ठल म्हणतो... भाव भक्तीने राबतो ऊन, वारा, पावसात पिका अंकुरा पाहतो लेकराच्या तो रूपात... जीवनातील दुःख हे पेरणे सुरू आहे. मात्र त्या दुःखावर मात करणारे लिखाण होणे गरजेचे आहे. जीवनच हे दु:खमय आहे.. माणसाचे काम हे दुःखावर मात करण्यासाठी आहे या शब्दात रचना सादर केली. रमेश चिल्ले यांनी झाडावर बांधले चिमण्यांनी गाव.. नावही ठेवले खोपेगाव वाऱ्यावर झुलतो बंगला... गावाकडे चला आता गावाकडे चला ही कविता सादर केली. यात गाव आणि शहर यातील फरक आणि स्वातंत्र्य कवितेतून मांडली. निशा कापडे : यांनी ये आई ही कविता साजरी केली. यातून त्यांनी आई आणि वडील यांची भूमिका मांडली. पडलेले प्रश्न यावर मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.