आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:चिमुकल्यांच्या नृत्याने गेवराईत‎ घुमरे स्कूलचे स्नेहसंमेलन रंगले‎

बीड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील द. बा. घुमरे पब्लिक स्कूलच्या‎ वार्षिक स्नेहसंमेलनात बालगोपाळांनी मराठी, हिंदी‎ गाणे ,पोवाड्यासह गीतावर नृत्य करून पालक,‎ प्रेक्षकांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलनाचे‎ अायाेजन गुरुवारी २ मार्च रोजी शाळेच्या प्रांगणात‎ केले हाेते. संस्थेचे अध्यक्ष दिपक घुमरे, प्रशांत पवार,‎ पत्रकार दिनकर शिंदे, उद्धव घोडके, सखाराम शिंदे,‎ दत्ता लाड, माध्यमिकचे मुख्याध्यापक महादेव‎ आमरूळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सतीश घुमरे‎ आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना संस्थाध्यक्ष‎ घुमरे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण‎ विकासासाठी स्नेहसंमेलन होणे गरजेचे आहे. यावेळी‎ विद्यार्थ्यांनी लावणी,कोळी गिते,पोवाडे, मराठी, हिंदी‎ गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.‎ सूत्रसंचालन अनिल शिंदे तर आभार सतीष घुमरे‎ यांनी मानले.‎

बातम्या आणखी आहेत...